देश-विदेश: शेअर मार्केटमध्ये राखरांगोळी, अब्रू गमावली, आता मोदी सरकारनेही अदानींचा हात सोडला?

0
46
शेअर मार्केटमध्ये राखरांगोळी, अब्रू गमावली, आता मोदी सरकारनेही अदानींचा हात सोडला?

नवी दिल्ली: हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे याचि देहि याचि डोळा स्वत:च्या आर्थिक साम्राज्याची राखरांगोळी होताना पाहण्याची वेळ ओढावलेले गौतम अदानी सध्या चहुबाजूंनी संकटात सापडले आहेत. एकीकडे शेअर मार्केटमध्ये अदानी समूहातील कंपन्यांचे समभाग धडाधड आपटताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अदानी समूहातील सर्व कंपन्यांच्या समभागांनी निचांकी पातळी गाठली आहे. यानंतर भारतीय रिझर्व्ह बँक,सेबी आणि जागतिक पतमानांकन संस्थाही अदानी समूहाकडे संशयाने पाहायला लागल्या आहेत.https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-परशुराम-घाटात-दरड-कोसळल/

अशातच भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. मोदी सरकार हळूहळू अदानी यांच्यापासून फारकत घेताना दिसत आहे. जे सोप्या पद्धतीने येतं, ते तितक्याच सोप्या पद्धतीने जातं, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. मोदी सरकारच्या काळात गौतम अदानी यांच्या साम्राज्याची ज्याप्रकारे भरभराट झाली आहे, त्याकडे स्वामींचा रोख असल्याची चर्चा आहे.

एवढेच नव्हे तर सुब्रमण्मय स्वामी यांनी अदानी समूहाच्या मालकीच्या सर्व मालमत्तांचे राष्ट्रीयकरण करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. जेणेकरून भविष्यात या मालमत्तांचा लिलाव करुन पैसे वसूल करता येतील, असे स्वामींचे म्हणणे आहे. गौतम अदानी हे सरकारची विशेष मर्जी असलेले उद्योगपती असल्याचा आरोप आजवर अनेकांनी केला होता. परंतु, हिंडेनबर्ग रिपोर्ट समोर आल्यानंतर अदानी यांचे ग्रह फिरल्याचे दिसत आहे. कालपर्यंत उद्योगविश्वात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेला त्यांचा दबदबा झपाट्याने कमी होताना दिसत आहे.

अमेरिकन भांडवली बाजारातील डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून अदानी एन्टरप्रायजेस ही कंपनी डी लिस्ट करण्यात आली आहे. या निर्देशंकात जगभरातील आघाडीच्या कंपन्यांचा समावेश असतो. परंतु, अलीकडे शेअर बाजारात अदानी समूहाच्या कंपन्यांच्या झालेल्या वाताहतीमुळे dow jones sustainability indices मधून अदानी एन्टरप्रायजेसची गच्छंती झाली आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी याच मुद्द्यावर बोट ठेवत भारतीय शेअर बाजारात अदानी समूहावर अशाप्रकारची कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here