धक्कादायक! मुंबईत डेल्टा प्लसचा पहिला बळी; कोरोना लस घेतल्यानंतरही महिलेचा मृत्यू

0
117

कोरोनाव्हायरसची दुसरी लाट ओसरल्यानंतर राज्य सरकारनं लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले आहेत. परंतु, राज्यावर आणखी एक संकट आलं आहे. ते म्हणजे, डेल्टा प्लसचं. मुंबईत डेल्टा प्लसनं पहिला बळी घेतला आहे. धक्कादायक म्हणजे कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर महिलेला डेल्टा प्लसची लागण झाली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. कालच मुंबईत डेल्टा प्लसचे 20 रुग्ण आढळून आले होतं. राज्यात डेल्टा प्लसच्या रुग्णांची एकूण संख्या आता 65 वर पोहोचली आहे.

मुंबईच्या पूर्व उपनगरात राहणाऱ्या 60 वर्षीय महिलेचा डेल्टा प्लसमुळे मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या महिलेने कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले होते. महिलेला मधुमेहासह इतरही आजार होते. मुंबईत बुधवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या सात रुग्णांपैकी ही महिला एक होती, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबईतील डेल्टा प्लसने झालेला हा पहिला मृत्यू असल्याची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here