नवी मुंबईमध्ये ठिकठिकाणी महिलांनी महागाईविरोधी आंदोलनात केला केंद्र सरकारचा निषेध

0
93

आज संपूर्ण नवी मुंबईमधे मोदी सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. महिलांनी प्रखर घोषणा देवून केंद्र सरकारचा निषेध केला. गेले कित्येक महिने पेट्रोल व डिझेलच्या दरामधे वाढ होवून शंभरी गाठली आहे, गॅसच्या दरामधे मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने महिलांचे बजेट कोलमडले आहे. मोदी सरकारने अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सामान्य माणसाला जगणे मुश्किल करून ठेवले आहे. म्हणूनच प्रदेश अध्यक्ष मा.ना.जयंत पाटील साहेबांच्या आदेशाने व नवी मुंबई प्रभारी आमदार शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दिघा, ऐरोली, कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, सानपाडा, नेरूळ पूर्व, नेरूळ पच्छिम, सिवूड, सिबीडी बेलापूर या तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here