नागरिकांच्या रेशन कार्ड व इतर समस्या सोडविण्यासाठी आचरा ग्रामपंचायत येथे शिबीर संपन्न

0
102

आ.वैभव नाईक,नायब तहसीलदार संतोष खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत समस्यांचा निपटारा

रेशन कार्ड अपडेट करण्याबरोबरच विविध समस्यांमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर शिबिराचे आयोजन करून ग्रामस्थांच्या समस्या दूर करण्याच्या सूचना कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी झालेल्या मालवण तालुका दक्षता समितीच्या बैठकीत दिल्या होत्या. त्यानुसार आमदार वैभव नाईक, पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार संतोष खरात, यांच्या प्रमुख उपस्थितीत आचरा ग्रामपंचायत येथे आज पुरवठा शाखेच्या वतीने ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात आचरा येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडल्या. शिबिरात ग्रामस्थांच्या समस्या तात्काळ सोडविण्यावर भर देण्यात आला.
प्रत्येक ग्रामस्थाला रेशन कार्ड संदर्भातील आपली समस्या मांडण्याची संधी यावेळी देण्यात आली.ज्यांच्या रेशन कार्ड वरील नावे अपडेट करायची होती ती नावे तात्काळ अपडेट करण्यात आली. अनेक ग्रामस्थांच्या इतर समस्या देखील तात्काळ सोडविण्यात आल्या. तसेच रेशन कार्ड संदर्भातील माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. उर्वरित समस्यांबाबत ग्रामपंचायत मार्फत मालवण तहसील कार्यालय येथे पाठपुरावा करण्याच्या सूचना आ. वैभव नाईक यांनी दिल्या. अशा प्रकारचा उपक्रम इतर भागातही राबविला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक करत आभार मानले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, पंचायत समिती सदस्या निधी मुणगेकर,सरपंच प्रणया टेमकर, ग्रा. पं. सदस्या अनुष्का गावकर, विभाग प्रमुख जगदीश पांगे, विनायक परब, मुजफ्फर मुजावर,तलाठी श्री. काळे, सर्कल श्री. पाटील, पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर, तोंडवली सरपंच आबा कांदळकर, शाम घाडी, बबलू गावकर, सुबानंद कोयंडे आदी उपस्थित होते.

      

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here