नाशिकच्या रेव्ह पार्टीत हिना पांचाळ या मराठी अभिनेत्रीला अटक

0
81

नाशिक-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर इगतपुरीमधील एका रिसॉर्टवर नाशिक ग्रामीण पाेलिसांनी शनिवारी रात्री 2 वाजता छापा टाकला. या रिसॉर्टमध्ये रेव्ह पार्टी चालू होती. रेव्ह पार्टीमध्ये काेराेनाच्या निर्बंधांचे काेणतेही नियम पाळले नव्हते.मुंबईमधील एका बड्या बुकीच्या वाढदिवसानिमित्त ही जंगी पार्टी नायजेरियन ड्रग माफियाच्या सहकार्याने देण्यात आली होती. या पार्टीत हिंदी तसेच तेलगू चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या चार महिला आणि तरुण सहभागी होते. त्यात बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री हिना पांचाळ व अझार फारनूद या विदेशी महिलेसह दोन कोरिओग्राफर चाही समावेश आहे. हुक्का, कोकेन, हेरॉइनचा त्यात मुक्तहस्ते वापर सुरू हाेता.

हिना पांचाळ आयटम डान्सर म्हणून हिंदी, तामिळ आणि तेलगू फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करत अल्पवधीतच नाव कमावले आहे. ‍हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन सारख्या आयटम साँगमध्ये हिना थिरकताना दिसली. याशिवाय बलम बंबई आणि बेवडा बेवडा जालो मी टाइट या गाण्यांसाठी ती लोकप्रिय आहे.2019 मध्ये बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वात हिना सहभागी झाली होती. फेब्रुवारी 2020 मध्ये मुझसे शादी करोगे या डेटिंग रिअॅलिटी शोमध्येही ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here