नितेश राणेंनी जुळवून घेण्याचे संकेत दिल्यानंतर शिवसेनेकडून आमदार दिपक केसरकर यानी दिलेली प्रतिक्रिया…..

0
110
सिंधुदुर्गात सुरू होणार मत्स्य महाविद्यालय, आमदार नितेश राणे

वेंगुर्ले येथील कार्यक्रमात शिवसेनेसोबत जुळवून घेण्याचे संकेत दिल्याने सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे

सिंधुदुर्ग – अभिमन्यू वेंगुर्लेकर

मुंबई:- ठाकरे कुटुंबाला नेहमी लक्ष्य करणाऱ्या भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेसोबत जुळवून घेण्याचे संकेत दिल्याने सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात बोलताना नितेश राणे यांनी राज्याच्या विकासासाठी आणि पक्षाच्या नेतृत्वाने आदेश दिल्यास खांद्याला खांदा लावून काम करण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान नितेश राणे यांच्या भूमिकेवर शिवसेनेने प्रतिक्रिया दिली आहे.

सिंधुदूर्गमध्ये सागररत्न बाजपारपेठेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी नितेश राणे बोलत होते. शिवसेनेचे नेते दीपक केसरकर, विनायक राऊतदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. दरम्यान नितेश राणे यांनी आधी ठाकरे कुटुंबाबाबत केलेल्या वक्तव्यांप्रकरणी माफी मागावी अशी मागणी दीपक केसरकर यांनी एबीपी माझाशी बोलताना केली आहे.

“…तर खांद्याला खांदा लावून काम करु”; शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत नितेश राणेंचं मोठं विधान

“तो राजकीय कार्यक्रम नव्हता. १३ वर्ष रखडलेला हा प्रकल्प होता, त्यामुळे तो पूर्ण झाल्याचा आनंद सर्वांना होता. एक लक्षात घेतलं पाहिजे की, नितेश राणे यांच्याशिवाय कोणीही राजकीय भाषण केलं नाही. त्यांनी विकासात सर्वांनी एकत्र असलं पाहिजे असं म्हटलं आहे. ही भूमिका आम्हाला मान्य आहे. पण नितेश राणेंना शिवसेना आणि भाजपा एकत्र येऊ शकेल असं वाटत असेल तर त्यांनी प्रतीविधानसभा घेतली तेव्हा काय वक्तव्य केलं हे पाहिलं पाहिजे. आदित्य ठाकरेंचा डीएनए तपासला पाहिजे असं म्हणणं योग्य आहे का ? हे चरित्रहनन असून साध्या कुटुंबीतील व्यक्तीनेही सहन केलं नसतं,” असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.

पदभार स्वीकारताच नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले….

“उद्धव ठाकरे सौम्य दिसत असले तरी अत्यंत कडक आहेत. त्यांनी फोन करावा अशी अपेक्षा करता. माझा मुलगा चुकला असल्याचं सांगत नारायण राणे यांनी अनेकदा दिलगिरी व्यक्त केली आहे. ते सज्ञान आहेत आणि त्यांनीच फोन केला नाही असं वक्तव्य केलं. यावेळी अनेक फडणवीस, सुधीर मुनगंटीवार असे ज्येष्ठ नेते तिथे उपस्थित होते. त्यांनी थांबवायला हवं होतं. विकासात आम्ही राजकारण करत नाही आणि हेच त्यांनीही केलं पाहिजे,” असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे.

“संबंध एकतर्फी कधीच सुधारत नाहीत. त्यांनी आपली वक्तव्यं तपासून पाहिली पाहिजेत. त्याच्यात सुधारणा केल्यानंतर शिवसेना आणि भाजपा एकत्र येण्याची ही नांदी आहे म्हणण्याचा त्यांना नैतिक अधिकार आहे,” असं दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितलं.

नितेश राणे नेमकं काय म्हणाले?
“सिंधुदूर्ग जिल्हा, कोकण आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणासोबतही एकत्र काम करण्याची वेळ आली आणि आमच्या पक्षनेतृत्वाचा आदेश आला तर आम्ही सगळे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करु,” असं नितेश राणेंनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की, “काही दिवसांपूर्वी राज्यात युतीची चर्चा सुरु होती, ती नंतर बंद झाली. पण आता भाजपा आणि शिवसेनेचे नेते एकाच व्यासपीठावर आल्याने युतीचे चाहते सुखावले असतील. आज रात्री त्यांना चांगली झोप लागेल”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here