नीरज चोप्रावर गोल्ड जिंकल्याच्या 3 तासांच्या आत 13.75 कोटी रोख देण्याची घोषणा

0
98

नीरज चोप्रा याने ऑलिम्पिक ॲथलेटिक्स भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून 121 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. त्याने शनिवारी खेळलेल्या अंतिम सामन्यात 87.58 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले.

नीरजच्या या विजयाने संपूर्ण देश जल्लोषात मग्न आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक विजयाबद्दल त्याचे अभिनंदन केले. खुद्द पंतप्रधान त्याच्याशी फोनवर बोलले. गृहमंत्री अमित शहा, लष्करप्रमुख आणि राहुल गांधी, सोनिया गांधी यांनीही त्याचे अभिनंदन केले आहे.

नीरजच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर आता त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव सुरू झाला आहे. विजयाच्या 3 तासांच्या आत, नीरजला 13.75 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले. यामध्ये राज्य सरकारांपासून ते रेल्वे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि भारतीय ऑलिम्पिक संघटना, याच्या वतीने नीरजला रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

हरियाणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नीरजला 6 कोटी रुपये रोख आणि क्लास-वन नोकरी देण्याची घोषणा केली आहे. “आम्ही पंचकुलामध्ये खेळाडूंसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स बांधू. नीरजला हवे असल्यास, आम्ही त्याला तेथे प्रमुख बनवू. हरियाणा सरकार नीरजला 50% सवलतीसह भूखंड देईल.” मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी अभिनंदन करताना जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here