नेस्को संकुलात कोविड सेंटरसाठी आमदार निधीतून मशिन्स देणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई

0
102
आमदार निधीतून मशिन्स

मुंबई, दि. १२ : कोरोनाच्या वाढती संख्या लक्षात घेऊन गोरेगाव येथील नेस्को जंबो कोविड सेंटर येथे आणखी दीड हजार रुग्णांच्या उपचारासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नुकतीच या केंद्राला भेट देऊन आढावा घेतला.यावेळी डॉ. नीलम अंद्रादे यांनी रुग्णांचा औषधोपचार, प्रवेश, जेवण व साफसफाई तसेच ऑक्सिजन व इतर औषधांचा पुरवठा याबाबत माहिती दिली. तसेच रुग्णांच्या रक्त तपासणीबाबत थायरोकेअर चाचणी केंद्राशी झालेला करार याबाबत माहिती दिली.

मुंबईतील रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे नेस्को संकुलात वाढीव १५०० बेड्स कार्यान्वित करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. यापैकी ५०० बेड्स ऑक्सीजन सुविधेसह सुसज्ज असतील. १५ एप्रिलपासून सर्व बेड्स कार्यान्वित करण्याचे आश्वासन महापालिका अधिकाऱ्यांनी दिले. सध्या उपलब्ध असलेल्या २९०० खाटांसह एकूण ४३०० रुग्णांची या एकाच संकुलात सोय होऊ शकेल.रेमडेसिवीर औषधाचा पुरेसा साठा असून अधिक सुमारे १००० व्हायल्स आजच उपलब्ध होत आहेत तर पुरेसा ऑक्सिजन जम्बो सिलिंडर व आयनॉक्स टाक्यांमध्येही उपलब्ध आहे. डॉक्टर, नर्सेस व वॉर्डबॉय नेमले असून या आठवड्यात अधिक भर पडणार आहे.

अतिदक्षता विभागातील सुविधाही वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.परिसरातील स्वच्छता, शौचालयांची साफसफाई व गरम पाण्याच्या सोयीचेही निरिक्षण करण्यात येऊन आवश्यक खबरदारी घेयाच्या सूचना श्री. देसाई यांनी दिल्या.नेस्को संकुलात आतापर्यंत 1,17,000 व्यक्तिंचे लसीकरण झाले असून मागील आठवड्यातील लसीकरणाचा पुरवठ्यातील खंड आता भरुन निघाला असून दररोज 6 हजार व्यक्तिंचे लसीकरण पूर्ण केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here