पंतप्रधान पीक विमा योजनेची मुदत टळल्याने शेकडो आंबा व्यवसायिक हवालदिल

0
79

रत्नागिरी – पंतप्रधान पीक विमा योजनेची मुदत १५ मे पर्यतच ग्राह्य धरली गेल्याने त्याचा फटका नुकत्याच झालेल्या तौक्ते वादळातील हानी झालेल्या कोकणातील आंबा व्यवसायिकांना बसला असून शेकडो आंबा व्यवसायिक हवालदिल झाले आहेत. पंतप्रधान पीक विमा योजनेची मुदत अडसर ठरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झालेल्या आंबा व्यवसायिकांना याचा फटका बसला असून हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित रहाणार असून नेमलेली मुदत वाढविण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here