पद्मश्री डॉ. केके अग्रवाल यांचे करोनामुळे निधन

0
108

इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि हार्ट केअर फाऊंडेशनचे प्रमुख पद्मश्री डॉ. के.के अग्रवाल (वय 62) यांचे सोमवारी रात्री 11.30 च्या सुमारास करोना संसर्गामुळे निधन झाले. दोन महिन्यांपूर्वी डॉ. केके अग्रवाल यांनी करोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते.गेल्या महिन्यात त्यांना संसर्ग झाला होता. अग्रवाल यांना करोना संसर्ग झाल्यानंतर एम्सच्या आयसीयूमध्ये दाखल केले होते. तीन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरच्या आधारावर ठेवण्यात आले होते.

करोना कालावधीत डॉ.के.के.अग्रवाल यांनी हजारो लोकांना मदत केली.आर्थिकदृष्ट्या दुर्बल रूग्णांवर त्यांनी विनामूल्य उपचार केले.२०१० साली अग्रवाल यांना पद्मश्री पुरस्काराने देखील गौरविण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here