परमबीरसिंग रशियात पसार झाल्याचा संशय

0
61

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग हे अटकेच्या भीतीने देश सोडून रशियाला पळाल्याचा संशय एनआयए, मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारला आहे.अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयए तपास करत आहे. परमबीर सिंग यांच्यावर महाराष्ट्रात विविध पोलिस स्टेशनमध्ये अॅट्राॅसिटी व खंडणीचे पाच गुन्हे दाखल आहेत.अँटालिया स्फोट प्रकरणी परमबीर यांची १७ मार्च रोजी बदली झाली. होमगार्ड महासंचालक पदाचा त्यांनी २२ मार्चला पदभार स्वीकारला. ४ मे पासून ते रुजू होणार होते. मात्र त्यांनी वैद्यकीय रजा टाकली. आयोगाने चार वेळा परमबीर यांना समन्स पाठवली आहेत. अटक वाॅरंटही काढलेले आहे. चंदीगढ, रोहतक व मुंबईतील घरी त्यांना संपर्क करण्यात तपास यंत्रणांनी प्रयत्न केला. सध्या त्यांचा मोबाइल बंद आहे.विविध पाच गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र पोलिस त्यांना कधीही अटक करण्याची शक्यता आहे. त्या भितीने परमबीर युरोपातील देशात लपले असावेत, असा कयास वर्तवण्यात येत आहे.

शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ आजारी असल्याने त्यांना गुरुवारी ईडी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.आयसीयूमध्ये ४ दिवस उपचार करूनही त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना गुरुवारी एसव्हीएस रुग्णालयात हलवण्यात आले आहे.आज दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेताना ईडीचे अधिकारी त्यांच्यासोबतच होते. अटकेपासून संरक्षण मिळावे, यासाठी अडसूळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने अटकेपासून संरक्षण न दिल्यास ईडी अडसूळांना कोणत्याही क्षणी अटक करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

परमबीर सिंग देशाबाहेर गेल्याचे माझ्याही कानावर आले आहे. वास्तविक शासकीय अधिकाऱ्यास विनापरवानगी देश सोडता येत नाही. त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here