परमबीर सिंग यांच्यावर मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी कसाबचा फोन लपवून महत्त्वाचे पुरावे नष्ट केल्याचा आरोप

0
74
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परम बीर सिंह स्वत: अडचणीत सापडले आहेत. भगोडा जाहीर केल्यानंतर त्यांच्या वकिलांनी जीवाला धोका असल्याचे सांगत न्यायालयात हजर राहण्याचे मान्य केले. निवृत्त एसीपी समशेर पठाण यांनी परम बीर सिंग यांच्यावर मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबचा फोन लपवून त्याच्या विरोधातील महत्त्वाचे पुरावे नष्ट केल्याचा गंभीर आरोप केला आहे. परम बीर सिंह यांची आज सात तास चौकशी चालली होती पण त्यांनी वरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

निवृत्त एसीपी समशेर पठाण यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात या प्रकरणाची चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे. 26/11च्या हल्ल्यावेळी परमबीर सिंग हे एटीएसमध्ये होते. त्यावेळी परमबीर सिंग यांनी दहशतवादी अजमल कसाबचामोबाइल स्वत: कडे ठेवून घेतला होता. आजतागायत कसाबच्या मोबाईल तपास यंत्रणेच्या हाती लागलेला नाही. पठाण यांच्या गंभीर आरोपानंतर परमबीर सिंग चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

डी. बी. मार्ग पोलिस स्टेशनचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक माळी यांनी आपल्याला अजमल कसाबकडून एक मोबाइल फोन सापडल्याचं सांगितलं होतं. तो फोन पोलिस स्टेशनमध्ये पोलीस हवालदार कांबळे यांच्याकडे ठेवण्यास दिला होता. मात्र, परम बीर सिंह यांनी दहशतवादी अजमल कसाबचा मोबाइल स्वत:कडे ठेवून घेतला होता. आजपर्यंत कसाबचा मोबाईल तपास यंत्रणेच्या हाती लागलेला नाही. पुढे या प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतरही परम बीर सिंह यांनी तो मोबाईल क्राइम ब्रँचकडे सूपर्द केला नाही. दहशतवादी कसाबविरोधातील महत्त्वाचे पुरावे नष्ट केल्याप्रकरणी परम बीर सिंह यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील समशेर पठाण यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here