पहिल्या कॅबिनेट बैठक: कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी 23 हजार कोटींच्या निधीला मंजुरी

0
91

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची पहिली बैठक पार पडली. त्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर नियंत्रणाच्या तयारीसाठी २३,१२३ कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर झाले.केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदल आणि विस्ताराच्या दुसऱ्याच दिवशी बहुतांश मंत्र्यांनी पदाभार स्वीकारला.एक लाख कोटी रुपयांच्या कृषी पायाभूत निधी योजनेत दुरुस्ती करून या निधीचा वापर कृषी उत्पन्न बाजार समित्या बळकट करण्यासाठी केला जाईल.

जीनोम सिक्वेन्सिंग मशीन वाढवल्या जातील. प्रत्येक जिल्ह्यात एक कोटी रुपयांच्या औषधांचा बफर स्टॉक, १० हजार लिटर ऑक्सिजन स्टोअरेजची व्यवस्था असेल. जिल्हास्तरावर बालचिकित्सा संस्था, टेली-आयसीयू सेवेसाठी प्रत्येक राज्यात बालचिकित्सा सुधारणा केंद्र स्थापले जाईल. ८,८०० नव्या रुग्णवाहिकांची खरेदी करण्यात रणा.

कृषी उत्पन्न बाजार समित्या बळकट करण्यासाठी १ लाख कोटी बाजार समित्या कायम करणार, त्या मजबूतही करणार, शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यानी केले.नारळ मंडळ अधिनियमात दुरुस्ती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. कृषी पायाभूत सुविधा निधीअंतर्गत दिली आहे.२५ ठिकाणांसाठी दोन-दोन कोटी रुपयांच्या कर्जावर व्याज सूट मिळेल. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here