तिलारी उपकालव्याचे पाणी पाइपलाइनच्या सहाय्याने नेण्यासाठी मारलेल्या छोट्या चरात पडून गवारेडा मृत्युमुखी पडल्याची घटना आज पहाटे इन्सुलीत घडली आहे. इन्सुली माऊली मंदिर परिसरात स्वस्तिक कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून हे काम सुरू होते.
पहाटेच्या सुमारास अंधारात अंदाज न आल्याने या चरात गवारेडा उभा जाऊन पडला. चर छोटा व अरुंद असल्याने गवा अडकल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली असून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.