पाकिस्तानमध्ये दोन पॅसेंजर गाड्यांची टक्कर;30 प्रवाशांचा मृत्यू

0
58

पाकिस्तानमध्ये आ पहाटे मोठा रेल्वे अपघात झाल्याचे समोर येत आहे. हा अपघात पाकिस्ताच्या सिंध प्रांतातील डहरकी भागात झाला असून यामध्ये दोन पॅसेंजर गाड्यांची टक्कर झाली. दरम्यान, यामध्ये आतापर्यंत 30 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 50 पेक्षा जास्त प्रवाशी गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, हा अपघात मिल्लत एक्स्प्रेस आणि सर सय्यद एक्सप्रेसमध्ये झाला आहे. त्यामुळे आणखी जास्त प्रवाशी बोगींमध्ये अडकले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आज सकाळी घोटकी भागातल्या डहरकीजवळ या दोन एक्स्प्रेस एकमेकांना धडकल्या आणि मिल्लत एक्स्प्रेसचे 8, तर सर सैयद एक्स्प्रेसचे इंजिनसह तीन डब्बे पटरीहून खाली घसरले. तसेच काही डबे दरीत कोसळले. या दुर्घटनेत 30 जणांचा मृत्यू झाला असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर रेल्वेच्या डब्यात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

ही घटना घडल्यानंतर बचाव दलाचे अधिकारी चार तासानंतर घटनास्थळी पोहचले. दरम्यान, त्यांनी बोगीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढायला सुरुवात केली. हा अपघात मोठा असल्याने बोगीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे बोगींना गॅस कटरने कापून प्रवाशांना बाहेर काढावे लागत होते. गंभीर प्रवाशांना ट्रॅक्टर-ट्रॉलीने रुग्णालयात दाखल करण्यात येत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here