पागे कोनाळकट्टा, घोटगेवाडी, परमे, घोटगे, अनियाळे-आवाडे, मणेरी, कुडासा, साटेली-भेडशी ग्रामस्थांनी सतर्कतेच इशारा

0
118

तिलारी प्रकल्पाच्या खळग्यातील दगडी धरणाचे चारही दरवाजे 20 ऑगस्ट पर्यंत उघडे ;तहसिलदार, बीडीओ, पोलीस निरीक्षक यांनी आवश्यकती खबरदारी घ्यावी – निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे


सिंधुदुर्ग – तिलारी प्रकल्पाच्या आरओएस व जीओएस नुसार खळग्यातील दगडी धरणाचे चारही दरवाजे 20 ऑगस्ट पर्यंत पूर्णपणे उघडे ठेवण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी. त्याचबरोबर दोडामार्गचे तहसिलदार, गटविकास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनी आवश्यकती खबरदारी घ्यावी, अशी लेखी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी आज केली.

तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळे धरण पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे 20 ऑगस्टपर्यंत खळग्यातील दगडी धरणाचे चारही दरवाजे पूर्णपणे उघडे ठेवण्यात येणार आहेत. यामुळे धरण क्षेत्रातील पाणलोट क्षेत्रमधून येणारे पाणी सांडव्यावरून उच्च कालव्याद्वारे थेट तिलारी नदीत जाणार आहे. सद्यस्थितीत हवामान विभागाने येत्या आठवड्यामध्ये अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे धरण परिसरात पावसाचे प्रमाण वाढत असल्याने पाणी पातळी वाढून तिलारी नदीवरील सर्व कॉजवे पाण्याखाली येण्याची शक्यता आहे.

तिलारी नदीची धोका पातळी 43.600 मीटर आहे. तर इशारा पातळी 41.600 मीटर आहे. आज सकाळी 8 वा. पातळी 40.400 मीटरपर्यंत पोहचलेली आहे. यावरून नदी काठच्या गावांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील लोकांसाठी पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. * तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या कोनाळकट्टा, घोटगेवाडी, परमे, घोटगे, अनियाळे – आवाडे, मणेरी, कुडासा, साटेली – भेडशी गावातील ग्रामस्थांना माहिती होण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय तसेच गावातील लोकांच्या निदर्शनास येतील अशा ठिकाणी फलकावर सूचना प्रसिद्ध करावेत. * रात्रीच्यावेळी नागरिकांनी नदीपात्रातून ये-जा करू नये. * नदी पात्रात कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिला, नदी पात्रात पाण्यासाठी गुरे सोडणारे शेतकरी यांनी याबाबत आवश्यकती सतर्कता बाळगावी. * कोनाळकट्टा, घोटगेवाडी, परमे, घोटगे, अनियाळे – आवाडे, मणेरी, कुडासा, साटेली – भेडशी ग्राम पंचायतींनी सतर्कतेबाबत दवंडी पिटवून लोकांना दक्ष राहण्यास सांगावे. * तालुक्यातील शोध व बचाव गटातील पोहणारे सदस्य यांना याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात याव्यात. * तालुक्यातील शोध व बचाव साहित्य सुस्थितीत ठेवण्यात यावे. * आपत्तीजनक स्थिती उद्भवल्यास त्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास त्वरीत द्यावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here