विजेच्या कडकडाटसह पुढील तीन तासात पुणे, सातारा, अहमदनगर, रत्नागिरी, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि विदर्भाच्या काही भागात पावसाचा इशारा हवामानविभाग तज्ज्ञ होसाळीकर यांनी दिला आहे. मुंबई आणि पुण्यात ढगाळ वातावरण राहणार आहे.
केरळातील अनेक भागात ढगाळ वातावरण झाले असून अनेक ठिकाणी पावसाला अनुकूल असे वातावरण तयार झाले आहे. केरळातील १४ हवामान केंद्रांवर चांगला पाऊस होत आहे. उद्यापासून केरळात पावसाचा जोर अधिक वाढण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात सरासरी 11 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे. सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक ठिकाणी वीजांच्या गडगडाटासह पाऊस आहे. 1 मार्च ते 31 मे पर्यंत देशात सरासरीपेक्षा 18 टक्के अधिक पाऊस तर महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा 13 टक्के अधिक पावसाची शक्यता आहे.