पुण्यात ‘कोरोना’मुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणात वाढ

0
72

पुण्यात ‘कोरोना’ बाधित रुग्ण वाढत असले तरी देखील कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देखील वाढत आहे, ही दिलासादायक बाब असल्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.कोरोना नियंत्रणासाठी तसेच वैद्यकीय सेवा सुविधा मिळवून देण्यासाठी डॉक्टरांबरोबरच सर्व अधिकारी रात्रंदिवस मेहनत घेत असल्याबद्दल सर्वांच्या कामाचे कौतुक करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांसाठी आरोग्य विषयक सेवा-सुविधांमध्ये वाढ करा. वैद्यकीय क्षेत्रातील उपलब्ध मनुष्यबळाचे योग्य नियोजन करा. डॉक्टरांच्या कामांच्या वेळेचे नियोजन करा.

शहर व ग्रामीण भागात ऑक्सिजन व व्हेंटिलेटरयुक्त बेड कमी पडणार नाहीत, याकडे लक्ष द्या. गृह अलगीकरणातील रुग्णांकडून नियमांचे काटेकोर पालन होते का, याकडे लक्ष द्या. रेमडेसिवीरच्या बाबतीत कडक धोरण राबवा, तसेच कोरोना लसीकरणाला गती देण्याची सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.कोरोनाच्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखतीचे व्हिडीओ सामाजिक माध्यमातून प्रसारित करा. यामुळे सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्नांचे देखील निरसन होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेच्यावतीने कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले. सद्यपरिस्थितीत शहरातील कोरोना रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटर युक्त बेडची गरज भासत आहे.

येत्या काळात गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिजन व व्हेंटिलेटरयुक्त बेडची संख्या वाढवणे गरजेचे आहे. हॉस्पिटलच्या बिलांचे ऑडिट काटेकोरपणे होणे गरजेचे आहे. रेमडेसिवीरचा वापर हॉस्पिटलमध्ये दाखल आवश्यक त्या रुग्णांनाच करायला हवा.डॉ.सुभाष साळुंके म्हणाले, अन्य राज्यातील कोरोना रुग्णही वाढत आहेत. त्यामुळे येत्या काळात अन्य राज्यांतून पुरेसा ऑक्सिजन मिळण्यात अडचण भासू शकते. हे लक्षात घेऊन नियोजन करण्यात येत आहे, असे सांगून कोविड-19 च्या नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.डॉ. डी. बी.कदम म्हणाले, गृह विलगीकरणातील रुग्णांकडून डॉक्टरांनी सांगितलेले उपचार व सूचनांचे पालन होत नसल्याचे दिसून येते. व या रुग्णांची तब्बेत बिघडत जाते. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वापराबाबत डॉक्टरांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, जिल्ह्यात ऑक्सिजनचा योग्य प्रमाणात वापर होण्यासाठी व ऑक्सिजनची उपलब्धता वाढवण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. श्री.राव यांनी लसीकरण व्यवस्था, रुग्णालयीन व्यवस्थापन, रुग्णदर, मृत्यू दर, पुणे ग्रामीण भागातील रुग्णवाहिका उपलब्धता, जम्बो कोविड रुग्णालय व्यवस्थापन, ऑक्सिजन व रेमडेसिवीर मागणी व सद्यस्थिती तसेच पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची क्षेत्रनिहाय माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

52People Reached3EngagementsBoost Post

22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here