पूरग्रस्तांच्या मदतीला वंचित बहुजन आघाडीची धाव

0
65

तुळसुली वार्ताहर

वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग अंतर्गत शाखा सवंतवाडीचे पदाधिकारी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले. जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांच्या आवाहनाने तालुकाध्यक्ष मोहन जाधव, तालुका महासचिव संदीप जाधव, सावंतवाडी शहर अध्यक्ष प्रदीप कांबळे मालवण तालुकाध्यक्ष अक्षय कदम यांच्या नियोजनातून तसेच ब्लू स्टार स्पोर्ट्स क्लब सावंतवाडी यांच्या सहकार्यातून पूरग्रस्तांसाठी मदत केंद्र उभारण्यातआले. दोन दिवसाच्या कालावधीत मदत केंद्रात कित्येक कर्त्यांनी मदतीचा हात पुढे केला.


जमा झालेली मदत सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील पुरस्थितीत सापडलेल्या सर्व गरीब कुटुंबा पर्यंत पोहचविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सावंतवाडी शाखा आणि गाव शाखा ओटवणे, साटेली, मळगाव, नेमळेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.जमा झालेली मदत अन्नधान्य किट आणि कपड्यांच्या स्वरूपात विभागून अती पूरग्रस्त भागातील म्हणजेच ओटवणे, सरमळे, विलवडे, वाफोली, बांदा, शेर्ले आणि इन्सुली अशा सावंतवाडी तालुक्यातील गावात तसेच वेंगुर्ले मधील शिरोडा गाव आणि सिंधुदुर्ग मधील इतर पूरग्रस्त गावात पोचविण्यात आली. यावेळी पूर परिस्थितीत आपल्यावर अचानक पणे उद्भवलेले संकट आणि त्यात उडालेली तारांबळ, वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या समोर मांडताना पूरग्रस्त लोकांचे अश्रू अनावर झाले.


या मदत कार्यात जिल्हाध्यक्ष परुळेकर सावांतवडी तालुकाध्यक्ष मोहन जाधव, तालुका महासचिव संदीप जाधव, सावंतवाडी शहर अध्यक्ष प्रदीप कांबळे, मालवण तालुकाध्यक्ष अक्षय कदम, ओटवणे गाव शाखा अध्यक्ष मधुकर जाधव, कोषाध्यक्ष आनंद जाधव, सदस्य रवी जाधव, साटेली गाव शाखा सचिव यशवंत जाधव, तुळस गावातून कृष्णा तुळसकर आदी कार्यकर्ते सक्रीय सहभागी झालेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here