सिंधुदुर्गनगरी दि.22 (जि.मा.का): सन 2020-2021 च्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी आणि इयत्ता 8वी सन 2021 च्या दिनांक 23 मे रोजी होणार होती. मात्र कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे आणि तांत्रिक कारणास्तव परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेली होती. कोरोना नियमांचे पालन करण्याच्या अटीच्या अधीन राहून परीक्षा दिनांक 8 ऑगस्ट 2021 रोजी आयोजन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. असे कळविण्यात आले आहे, या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांनी केले आहे