पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 12 ऑगस्ट रोजी

0
86
सिंधुदुर्ग: इयत्ता 5वी ची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता 8 वी ची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 12 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाव्दारे कळविले आहे.

प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी ही 9 ऑगस्ट 2021 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यातमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार असलेबाबत 27 जैलु 2021 च्या प्रसिध्दीप्रत्रकान्वये जाहिर करण्यात आले होते. काही जिल्हयात होत असेलेल्या अतिवृष्टीमुळे अद्भवलेली पुररिस्थिती व बहुतांश ठिकाणी भुस्खलन झाल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणीबाबत राज्यातील अनेक संघटनाकडून प्राप्त निवेदनाचा विचार करता.

परीक्षा 9 ऑगस्ट 2021 ऐवजी 12 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात येणार असल्याचे उपायुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे कडील 4 ऑगस्ट 2021 रोजीच्या पत्रान्वेये कळविण्यात आलेले आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र 27 जुलै 2021 रोजी संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. प्रवेशपत्र 12 ऑगस्ट 2021 च्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल.

या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन एकनाथ आंबोकर शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांनी कळविले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here