पॅंडोरा पेपर्स लीक प्रकरणात सचिन तेंडुलकरसह नावे उघड

0
97

जगातील धनाढ्यांनी विदेशात पॅंडोरा पेपर्स लीक प्रकरणात संशयास्पद आर्थिक गुंतवणूक केल्याची बाब उघड झाली आहे.या शोध मोहिमेत भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसह प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्यासह 300 भारतीयची नावं असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

‘इंडियन एक्सप्रेस’नुसार, या पेपर्समध्या सचिनशिवाय पत्नी अंजली तेंडूलकर सासरे आनंद मेहता यांच्या नावाचा समावेश आहे. किमान 60 प्रमुख व्यक्ती आणि कंपन्यांच्या ऑफसोर्स होल्डिंगची चौकशी करण्यात आली.भारतातील महसूल विभागाचे माजी अधिकारी, आयकर खात्याचे माजी आयुक्त आणि माजी सैन्याधिकाऱ्यांचाही समावेश आहे. पेंडोरा पेपर्समधील 11.9 मिलियम अर्थात 1.19 कोटी फायलींच्या लीकमध्ये पनामा, दुबई, मोनाको, स्वित्झर्लंड आणि केमॅन बेटांसारख्या दिग्गज करदात्यां समजल्या जाणाऱ्या ट्रस्ट आणि कंपन्यांचे दस्ताऐवज आहेत. त्यात जगातील 35 राजकीय नेत्यांची नावं आहेतय इतकंच नाही तर यात सत्ताधारी आणि माजी सत्ताधारी नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय उद्योगपती आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचा देखील समावेश आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here