प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी स्वत:पासुन करावी – जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत

0
105

सिंधुदुर्ग

स्वच्छ भारत मिशन माध्यमातून स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. कोरोनासारखी महामारी रोखण्यासाठी हातांची स्वच्छता महत्वाची भूमिका बजावत आहे. आपले आरोग्य आपल्या हाती आहे. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी लहानपणासुनच स्वत:घ्यावी व त्याची सुरुवात आपल्या स्वत:पासुन नंतर घर व गावापर्यत करावी असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी केले. तालुका सावंतवाडी येथील ग्रामपंचायत बांदा शाळा नं 1 येथे जिल्हास्तरीय हात धुवा दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, उपाध्याक्ष राजेन्द्र म्हापसेकर, जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, पंचायत समिती सभापती निकिता सावंत, पंचायत समिती उपसभापती श्री.राऊळ तसेच पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, गटविकास अधिकारी पंचायत समिती सावंतवाडीचे श्री.कणसे व सहा. गटविकास अधिकारी श्री.नाईक, ग्रामपंचात बांदाचे सरपंच अक्रम खान उपस्थित होते.

जिल्ह्यात कोरोना महामारीच्या काळात सुध्दा जिल्हावासीयांनी स्वच्छतेची कास धरुन तसेच कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून चांगला आदर्श निर्माण केलेला होता. भविष्यात देखिल स्वच्छतेचे विविध उपक्रम घेवून जिल्हा आरोग्य संप्पन बनवुया असे जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी सांगीतले. जिल्हयातील नागरीक हे स्वच्छतेच्या बाबतीत खुप जागृक आहेत व यामुळे आपण साथीचे रोग किंवा कोरोना सारख्या महामारीवर लवकर मात करु शकलो असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी केले.

आपल्या हातावर असणाऱ्या असंख्य रोगजंतू आरोग्यसाठी बाधक ठरु शकतात. या रोगजंतूना साबणाने हात धुवुन दूर केले ,तर सर्वांचाच भविष्यकाळ आरोग्यसंपन्न राहील . या अनुषंगाने जागतिक हात धुवा दिना निमित्ताने विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात यावी. साबणाने हात धुण्याच्या सवयीमुळे श्वसन रोगाचा मृत्यु दर 25 टक्के कमी होऊ शकतो, अणि अतिसार रोगामुळे होणारे मृत्यु सुध्दा 50 टक्के कमी होऊ शकतात. हात धुण्याच्या सवयी समाजात रुजविण्याकरिता व्यापक जनजागृती कार्यक्रम राबवावे असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विनायक ठाकूर यांनी आपल्या पस्ताविकामध्ये सांगीतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पाटील यांनी केले. जिल्हयातील सर्व शाळा, गामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र याठीकाणी हात धुवा दिन तसेच स्वच्छतेच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here