प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कर्जतमधील स्टुडिओला भीषण आग

0
95

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कर्जतमधील स्टुडिओला भीषण आग लागली आहे. कर्जत नगरपालिकेच्या अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असुन आग विझवण्याचे प्रयत्न सुरु होते.या ठिकाणी या फिल्मी दुनियेत अनेक सुप्रसिद्ध हिंदी आणि मराठी सिनेमाचे सेट आहेत. मात्र सध्या लागलेली आग ही नवीन मालिकेच्या चित्रिकरणासाठी उभारण्यात आलेल्या सेटला लागल्याची माहिती मिळत आहे.

आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. धुराचे लोट बऱ्याच दूरवरुनही दिसत असल्याने आग भीषण असल्याचे सांगितले जात आहे. या आगीत पूर्ण सेट जळून खाक झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here