प्रामाणिक डॉ. उमेश विठ्ठल पेंडूरकर यांना पदोन्नतीने न्याय

0
83

सिंधुदुर्ग -प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर

मालवण तालुक्यातल्या पेंडूर या छोट्याशा गावात गरीब कुटुंबात जन्मलेल्या डाॅ.उमेश विठ्ठल पेंडुरकर यांनी परिस्थितीशी झगडून शिक्षण घेतले. पुढे लांजा येथे पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम पूर्ण करून २००३ मध्ये वैभववाडी येथे पशुधन पर्यवेक्षक म्हणून पदभार स्वीकारला. तेथे १२ वर्षे प्रामाणिकपणे सेवा करून श्री. पेंडुरकर यांची आचरा (ता. मालवण) पशुवैद्यकीय दवाखान्यात २०१५ साली बदली झाली.

आचरा येथे आल्यानंतर अल्पावधीतच आपल्या कामाने आणि प्रेमळ स्वभावाने त्यांनी अनेक माणसे जोडली. कधी कोणाचा फोन आल्यावर क्षणाचाही विलंब न करता धावत जात, कुणाकडे पैसे नसले, तर राहू देत नंतर द्या..... असे म्हणणार! कोणी दवाखान्यात कामाचे पैसे देण्याचा प्रयत्न केला, ते सरळ सांगायचे.. माका परमेश्वरान खूप दिल्यान हा. तेच्यात मी सुखी आणि समाधानी आसय. तुमचां काम झालां हेचा माका समाधान! असे सांगणारा अधिकारी या भ्रष्टाचारी जगात दुर्मिळच!
. पदोन्नती होऊन प्रामाणिकपणाने, सत्याने वागणाऱ्या एका अधिकाऱ्याला देवाने न्याय दिला एवढे नक्की.

आचरा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन पर्यवेक्षक पदावर कार्यरत डॉ. उमेश विठ्ठल पेंडूरकर यांची आता कोचरे पशुवैद्यकीय दवाखान्यात सहाय्यक पशुधन अधिकारी म्हणून पदोन्नतीने बदली झाली आहे. सत्याला उशिराच न्याय मिळतो असे म्हणतात. ते डॉ. पेंडूरकर यांच्या बाबतीत खरे झाले. त्यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याला उशिरा का होईना, पदोन्नतीमुळे न्याय मिळाला आहे.
(डॉ. उमेश पेंडुरकर यांचा संपर्क क्रमांक – 94035 58274)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here