प्रियांकाच्या सोशल मीडिया हॅण्डलवरील नावात बदल

0
104

प्रियांकाच्या सोशल मीडिया हॅण्डलवरील नावात बदल दिसून आला.तिच्या नावातून ‘चोप्रा’ आणि ‘जोनास’ ही आडनावे काढून टाकली आहेत. तर ट्विटर अकाउंटवर आता केवळ प्रियांका एवढेच नाव ठेवले आहे. मुळे तिच्यात आणि पती निक यांच्या नात्यात वितुष्ठ निर्माण झाल्याच्या अफवा उठल्या आहेत.

प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी यावर प्रियांकाने अचानक जोनास हे आडनाव वगळण्यामागील कारणांबद्दल कोणताही खुलासा केलेला नसला तरी प्रियांका आणि निकच्या नात्यात दुरावा आल्याच्या अफवा फेटाळून लावल्या. “या चर्चा अर्थहीन आहेत, अफवा पसरवू नका,” असे पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

निक जोनासने अलीकडेच जिममध्ये वर्कआउट करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडिओवर कमेंट करताना प्रियांकाने लिहिले की, “Damn! मला तुझ्या कुशीत मरायचे आहे.” प्रियांकाने निकच्या बॉडीवर फिदा होऊन ही कमेंट केली आहे. प्रियांकाच्या या कमेंटमुळे ते दोघेही विभक्त होणार नसल्याचे कळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here