फ्रान्सवरून २० मेट्रीक टन ऑक्सिजनसह मुंबईत दाखल

0
97

देशात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत आहे. देशात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी भारतीय नौसेनेने विदेशातून ऑक्सिजन कंटेनर आणि सिलिंडर आणण्यासाठी एकत्र आले आहेत. नौसेनेने युद्धपातळीवर लिक्विड ऑक्सिजन सिलिंडर आणि कंटेनर्स त्याचबरोबर इतर वैद्यकीय उपकरणे भारतात आणली आहेत.

ऑपरेशन समुद्र सेतूच्या माध्यमातून सोमवार दि़ १० मे रोजी कतार, कुवैत आणि सिंगापूर येथून लिक्विड ऑक्सिजन आणि कंटेनर्स भारतात दाखल झाले आहेत.ऑपरेशन समुद्र सेतूचा भाग दोन असलेल्या भारतीय नौदलाचे त्रिकंड हे जहाज कतार हमद बंदरावरुन लिक्विड मेडीकल ऑक्सिजन आणि कंटेनर्स घेऊन मुंबईच्या डॉकयार्डमध्ये दाखल झाले आहे. कतार ते भारतपर्यंत ऑक्सिजन पोहचवण्याचा हा पहिला प्रयत्न होता. त्रिकंड हे जहाज ५ मे रोजी कतारमध्ये गेले त्यानंतर आता १० मे रोजी त्रिकंड मुंबईत दाखल झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here