फ्लिपकार्टचा ‘द बिग बिलियन डेज’ सेल उद्या 3 ऑक्टोबरपासून सर्वांसाठी खुला

0
64

फ्लिपकार्टचा ‘द बिग बिलियन डेज’ सेल उद्या 3 ऑक्टोबरपासून सर्वांसाठी खुला होईल आणि हा सेल 10 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेजच्या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. सेल दरम्यान, साइटवर फ्लिपकार्ट मिनी फ्लॅश सेल, बंडल एक्सचेंज आणि पेमेंट ऑफर आणि इतर डील्सची सीरीज घेऊन येणार आहे. फ्लिपकार्टने अॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेसोबत भागीदारी केली आहे. या बँकांचे बँक कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना 10 टक्के सूट मिळेल.

सण आणि उत्सवांच्या मुहूर्तावर भारतीय ई-कॉमर्स क्षेत्रातील स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे. कारण वॉलमार्टच्या मालकीच्या फ्लिपकार्टने प्रतिस्पर्धी अमेझॉनच्या उत्सवाच्या मुहूर्तावरील सेलसोबतच ‘द बिग बिलियन डेज’ सेल सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. फ्लिपकार्टने याआधी बिग बिलियन डेज सेलचा (Flipkart Big Billion Days) आठवा सीझन यावर्षी 7 ते 12 ऑक्टोबर दरम्यान आयोजित केली जाईल अशी माहिती दिली होती. परंतु अमेझॉनच्या ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ सेल 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याचे फ्लिपकार्टनेही याच तारखेला आपला सेल सुरू करण्याचे ठरवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here