‘बसपन का प्यार’ व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये

0
186

सोशल मीडियावर ‘बसपन का प्यार’ ट्रेंड करत आहे. एक शाळकरी मुलगा वर्गामध्ये ‘बसपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे’ गात आहे. त्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.

छत्तीसगड राज्यातील सुकमा येथील छिंदगड येथे राहणाऱ्या या मुलाने दोन वर्षांपूर्वी ‘बसपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे’ गात व्हिडियो बनवला. या मुलाचे नाव सहदेव दिरदो असून त्याचा व्हिडियो पुन्हा एकदा जोरदार व्हायरल झाला आहे. गंमत म्हणजे ‘बचपन’ऐवजी सहदेव ‘बसपन’ म्हणत आहे. या व्हिडियोची लोकप्रियता एवढी वाढली की रॅप गायक बादशहाने सहदेवशी संपर्क साधला आणि त्याला चंदिगडला भेटायला बोलावले आहे .

अमेरिकेतील प्रसिद्ध डान्सर रिक पॉंड हादेखील या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे. देशविदेशातील लोक ‘बसपन का प्यार’चे दिवाने झाले आहेत. या गाण्याचे कित्येक जण आपापल्या अंदाजात रिमेक व्हिडियो बनवत आहेत.या गाण्यामुळे माझी झोप उडालीय, अशी मिश्कील कबुली नुकतीच अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने दिली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here