बारावी बोर्डात कोकणची बाजी !

0
108
दहावी निकाल,
दहावीच्या निकालात पुन्हा कोकणची बाजी; कोकणातील ९९.०१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल 99.63 टक्के एवढा लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत निकालात 8.97 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर औरंगाबाद या विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.कोकण बोर्डाचा निकाल 99.81 टक्के लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा 99.92 टक्के आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल 99.60 टक्के लागला आहे.

कोकण बोर्डातून 27,384 विद्यार्थ्यांपैकी 27,322 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये 13.854 मुले आणि 13, 478 मुलींची संख्या आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून 17.682 प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी 17.668 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांचे प्रमाण 8.925 आणि मुलींचे प्रमाण 8,743 आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 9,702 विद्यार्थ्यांपैकी 9,664 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये 4,929 मुले आणि 4.735 मुलींची संख्या आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल 99.83 टक्के, कला शाखेचा निकाल 99.93 टक्के, वाणिज्य आणि व्यावसायिक विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विमान शाखेचा निकाल 98.55 टक्के, कला शाखेचा निकाल 100 टक्के वाणिज्य शाखेचा निकाल 99.97 टक्के आणि व्यावसायिक विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here