जागृती फाउंडेशन चाईल्डलाईन सिंधुदुर्गचा बालकांसाठी उपक्रम
सिंधुदुर्गनगरी : जागृती फाउंडेशन चाईल्ड लाईन सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्ह्यातील ३१ लाभार्थ्यांना ‘बालसंगोपन’ योजनेच्या माध्यमातून लाभ मिळण्यासाठी सहकार्य करण्यात आले. लाभार्थी बालकांच्या बचत खात्यात अनुदानाचा थेट लाभ मिळत आहे. या अनुषंगाने चाईल्डलाईन १०९८ जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी लाभार्थी पाल्य व पालक उपस्थित होते.
या जनजागृती कार्यक्रमात बालकांचे मुलभूत हक्क, बालकांवर होणारे अत्याचारांचे स्वरूप, बालक व पालकांनी घ्यावयाची दक्षता, पोक्सो तसेच बाल न्याय अधिनियम या विषयांवर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. जागृती फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीम. हेमांगी धुरी, प्रकल्प संचालक हर्षल धुरी, समन्वयक संजोग जाधव, समुपदेशक तृप्ती धुरी, टीम मेंबर सोनाली गावडे, अन्विता जाधव, नेहा सावंत आदी उपस्थित होते.