बिग बॉस 11 फेम अर्शी खान अपघातात थोडक्यात बचावली

0
129

बिग बॉस 11 फेम अर्शी खानच्या कारला दिल्लीतील मालवीय नगर भागात शिवालिक मार्गावर अपघात झाला. तिच्या हातापायाला दुखापत झाल्याचं समजतं .त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अर्शी खान या अपघातात थोडक्यात बचावली आहे. तिच्यावर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

अर्शी खान तिच्या मर्सिडीज कारमधून जात असताना हा अपघात झाला. तिच्यासोबत असिस्टेंट देखील होता. तिची कार थडकली असता एअरबॅग ओपन झाली. त्यामुळे अर्शी खान थोडक्यात बचावली. मात्र, तिला हातापायाला दुखपत झाली आहे. तिला जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here