बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांनी छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. रेखा यांनी काही महिन्यांपूर्वी मालिकेचा पहिला प्रोमो शूट केला होता .हा प्रोमो मंत्रमुग्ध करणारा असून रेखा यांच्या मधुर आवाजात साई आणि विराट यांच्या जीवनाची कहाणी ऐकायला मिळत आहे आणि तो हिट ठरला. अभिनेत्री रेखाचे चाहते पुन्हा एकदा रेखा यांना टेलिव्हिजन स्क्रिनवर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
विशेष म्हणजे चाहत्यांची ही प्रतिक्षा आता संपली आहे. मालिकेच्या निर्मात्यांनी आपल्या चाहत्यांना नवीन प्रोमोच्या माध्यमातून सरप्राइज देण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा रेखा यांचे दर्शन प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर घडत आहे. ‘गुम है किसे के प्यार में’ या मालिकेत निल भट्ट, आयेशा सिंग आणि ऐश्वर्या वर्मा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. तसेच अभिनेत्री किशोरी शहाणे यांचीदेखील महत्त्वाची भूमिका या मालिकेत आहे.