बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या आई अरुणा भाटिया यांचे निधन

0
96

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे वयाच्या निधन झाले.त्यांना काही दिवसांपूर्वी मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.आयसीयूत त्यांच्यावर उपचार सुरु होते.मात्र उपचारादरम्यान  वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.आईच्या निधनाची बातमी अक्षय कुमारने स्वतः ट्विट करून दिली आहे.मुंबईतील विले पार्ले स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 ‘ती माझा कणा होती आणि आज मला तिच्या जाण्याने अंतःकरणात असह्य वेदना होत आहेत. माझी आई श्रीमती अरुणा भाटिया यांनी आज जगाचा निरोप घेतला आहे आणि ती माझ्या वडिलांकडे दुसऱ्या जगात गेली आहे. या कठीण काळात माझ्या कुटुंबासाठी तुम्ही केलेल्या प्रार्थनांना आदर करतो. ओम शांती.’ असे अक्षय कुमारने स्वतः ट्विट केले आहे.

अक्षय कुमारच्या मुलाच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी अरुणा भाटिया यांनी अखेरचा श्वास घेतला. अक्षय कुमारच्या मुलाचा वाढदिवस 9 सप्टेंबरला येतो. अक्षय लंडनमध्ये त्याच्या आगामी ‘सिंड्रेला’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेला होता.पण आईची प्रकृती ठिक नसल्याची बातमी मिळाल्यानंतर तो तातडीने चित्रीकरण अर्धवट सोडून सोमवारी मुंबईला परतला होता. 

अक्षय कुमारच्या आईच्या निधनावर चाहत्यांसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here