बॉलिवूड चित्रपट निर्माते रायन स्टिफन यांचे गोव्यात कोरोनामुळे निधन

0
101

बॉलिवूड चित्रपट निर्माते रायन स्टिफन यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.काही दिवसांपूर्वी रायन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर गोव्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज शनिवारी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले अशी माहिती ‘इंदू की जवानी’चे दिग्दर्शक अबिर सेनगुप्ता यांनी दिली आहे. गोव्यामध्ये ते आई आणि कुटुंबीयांसोबत राहत होते.

‘इंदू की जवानी’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती. यामध्ये कियारा अडणवाणी हिची मुख्य भूमिका होती. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्ससोबतही रायन यांनी काम केले होते. बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी रायन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘फार लवकर सोडून गेलास’, असा मेसेज कियाराने इन्स्टाग्रामवर लिहिला आहे.

वरुण धवन, आलिया भट्ट यांनीसुद्धा सोशल मीडियाद्वारे रायन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “ही खूपच धक्कादायक बातमी आहे. माझा अजूनही विश्वास बसत नाही आहे की रायन आपल्यात नाही. रायन मित्रा, तुझी फार आठवण येईल,” अशा शब्दांत अभिनेता मनोज वाजपेयीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here