बॉस मराठी सीझन 3’ चा महाविजेता ठरला विशाल निकम!

0
77

‘बिग बॉस मराठी सीझन 3’ या ‘कलर्स मराठी’ वरील महाविजेतेपदाचा मान टीव्ही कलाकार मराठमोळा विशाल निकम याला मिळाला. ‘बिग बॉस मराठी सीझन 3’ चा महाअंतिम सोहळा नुकताच मोठ्या उत्हासात झाला. या महाअंतिम सोहळ्यात विशाल निकम, विकास पाटील , मीनल शहा ,उत्कर्ष शिंदे आणि जय दुधाणे पोहोचले होते. परंतु, विशाल निकम आणि जय दुधाणे या दोघात अंतिम सामना रंगला. विशाल याला जनतेची अधिक मते मिळाली. त्यामुळे त्याने जयला मागे टाकत अखेर विशाल याने ‘बिग बॉस मराठी सीझन 3’ चा वीस लाख रुपये आणि मानचिन्ह पटकावले.

विशाल निकम सांगली जिल्ह्यातील देवखिंडीचा असून त्याचा जन्म 10 फेब्रुवारी 1994 रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला आहे. त्याने सांगलीतील विटा येथील महाविद्यालयातून भौतिकशास्त्रात पदवी घेतलीआहे . विशालला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. मग कॉलेजमध्ये आल्यानंतर फिटनेसचीआवड देखील निर्माण झाली. विशालने 2018 मध्ये ‘मिथुन’ या चित्रपटातून मुख्य भूमिका साकारत आपल्या अभिनयास सुरूवात केली. या चित्रपटात प्रमुख अभिनेत्री म्हणून अमृता धोंगडेने काम केले होते. त्यानंतर विशाल मराठी चित्रपट ‘धुमस’मध्येही दिसला. मात्र ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ आणि ‘जय भवानी जय शिवाजी’ या टीव्ही मालिकांने , त्याला खरी लोकप्रियता मिळवून दिली.

विशाल ‘बिग बॉस मराठी सीझन 3’ शोच्या पहिल्या एपिसोडपासून सचोटीनं खेळला. मित्रा असोत की दुश्मन, विशालने नेहमीच न्याय्य पद्धतीने प्रत्येक टास्क खेळण्याचा प्रयत्न केला. विशालचा हाच प्रामाणिक पणा सर्वांनाच आवडल्याने त्याला परीक्षकांची मते अधिक मिळाली आणि तो विजेता ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here