आरोपींनी 9 सोसायटीजमध्ये अशा प्रकारचेच बनावट लसीकरण कँप लावले होते अशी माहिती तपासात समोर आली आहे. या बोगस लसीकरणाचा सूत्रधार 10 वी नापास असून त्यानेच या सर्वच आराखडा तयार केला होता.त्याशिवाय मध्यप्रदेशातील सटाणा येथून लस मागविल्या होत्या. 17 वर्षांपासून मेडिकल फील्डमध्ये काम करत होता.
या व्हॅक्सीनेशनचे आयोजन सरकार किंवा BMC कडून करण्यात आलेले नव्हते.तपासात या बोगस लसीकरणात कोणत्याही अधिकृत सोर्सकडून व्हॅक्सीन खरेदी केल्याचे पुरावेही मिळालेले नाहीत. लोकांना जी व्हॅक्सीन देण्यात आली, त्याचे सील पहिलेच तुटलेले होते. लोकांना जे सर्टिफिकेट देण्यात आले ते हॉस्पिटलचे आयडी चोरून तयार करण्यात आले होते याचे पुरावे मिळाले आहेत.
30 मेला हीरानंदानी हाउसिंग सोसायटी परिसरात 390 लोकांना कोवीशील्डचा डोस देण्यात आला. प्रत्येक डोससाठी 1,260 रुपये घेण्यात आले होते. सोसायटीकडून एकूण 4 लाख 91 हजार 400 रुपये देण्यात आले होते.व्यक्ती आहे. लसींचा जुगाड करणे आणि कँपची जबाबदारी सांभाळण्याचे काम त्याच्या खांद्यावरच होते.. लस घेतल्यानंतर कुणालाही ताप अथवा थकव्याचे लक्षण दिसले नाही ,तसेच या टोळीने त्यांना लसीकरणावेळी सेल्फी काढू दिला नव्हता हेही लोकांच्या लक्षात आले.त्यामुळे सोसायटीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.