विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांची उमेदवारी ऐनवेळी कापण्यात आली, तर आता डॉ. प्रीतम मुंडे यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाले नाही.त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीसांची रविवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी तासभर बैठक झाली. यावेळी पंकजा मुंडे आणि विनोद तावडे हे देखील या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीच्या निमित्ताने पंकजा यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने नाराज झाल्या आहेत. ही बैठक पाचतास चालली होती.यावेळी पंकजा मुंडे यांनीही मोदी यांची भेट घेतली मात्र त्याचा तपशील मात्र मिळू शकला नाही.
प्रीतम मुंडे यांना डावलल्याच्या निषेधार्थ बीड जिल्ह्यातील पंकजा समर्थक दोन जिल्हा परिषद सदस्य, एक पंचायत समिती सदस्य आणि पक्षातील सुमारे ५५ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. बीडप्रमाणेच अहमदनगर जिल्ह्यातील पंकजा समर्थकांनीही राजीनामे दिले आहेत.दोन दिवसांत ५५ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे जिल्हाध्यक्षांकडे दिले आहेत.