वेंगुर्ले । प्रतिनिधी अजय गडेकर
गोवा राज्यात रोजगारासाठी वेंगुर्ले तालुक्यातील शेकडो युवक – युवती रोज ये – जा करतात. परंतु लाॅकडाऊन च्या काळात सीमेवरील निर्बंधांमुळे अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले आहेत.त्यातच काही ठिकाणी अपघात घडले व त्यात काही जणांनी आपले जिव गमावले.ज्यांच्या जवळ दुचाकी होती ते युवक – युवती महाराष्ट्र हद्दीत सातार्डा येथे आपली दुचाकी लाऊन पुलावरून चालत जाऊन गोवा राज्यात बस पकडुन नोकरीला जात होते.परंतु सध्याच्या पावसाळी दिवसात त्यांना फार त्रास सहन करावा लागत होता.ही अडचण लक्षात घेऊन भाजपा वेंगुर्ले च्या वतीने सातत्याने गोवा येथे नोकरी निमित्त जाणाऱ्यांसाठी एस्. टी. ची वाहतुक सुरु करावी अशी मागणी करण्यात आली होती व एस्. टी.ची वाहतुक सुरु केली नाहीतर प्रसंगी आंदोलन करु, असा इशारा एस्. टी.प्रशासनाला दिला होता.
भाजपाच्या या मागणीची दखल घेऊन एस्. टी.महामंडळाने सोमवार दिनांक २ ऑगस्ट पासून सकाळी ६ .३० वाजता वेंगुर्ले आगारातुन सातार्डा पर्यंत फेरीची घोषणा केली आहे. तसेच ती गाडी तिथेच थांबवून सायंकाळी ७ वाजता सातार्डा येथुन वेंगुर्ले येथे रवाना होणार आहे.तरी नोकरीनिमित्त व कामाधंद्यासाठी जाणाऱ्या वेंगुर्ले वासियांनी या एस्. टी.सेवेचा लाभ घ्यावा,असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी केले आहे.