भाजप खासदार वरुण गांधी यांचा त्यांचाच पक्ष भाजपाला खणखणीत सवाल

0
88

संजय गांधी आणि मनेका गांधी यांचे पुत्र वरुण गांधी आपल्या आईबरोबर भाजपमध्ये अनेक वर्ष सक्रिय आहेत. हल्ली बऱ्याच वेळा ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आपल्या पक्षाला प्रश्न विचारत आहेत.आजही त्यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत उत्तर प्रदेश सरकारवर डागली तोफ डागली आहे.त्यांनी आपल्या मतदारसंघातील पीक खरेदीत कोणत्याही प्रकारची अनियमितता चालणार नाही.कृषी कायदा आणि यूपी सरकारवर सातत्याने होणाऱ्या टीकेमुळे वरुण गांधींना करावा लागतोय पक्षाच्या नाराजीला सामना करावा लागत आहे.मध्यंतरी पक्षाच्या कार्यकारिणीमधूनही मनेका आणि वरुण गांधी यांना वगळण्यात आले होते.


वरुण गांधी यांनी जर शेतकऱ्यांच्या बाबतीत भ्रष्टाचार झाला तर सरकारसमोर झुकणार नाही, तर थेट कोर्टात जाणार असा धमकीवजा इशारा सरकारला दिला आहे. वरुण गांधी यांनी स्वत:च आपल्या या बोलण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जोपर्यंत MSP ची हमी मिळत नाही तोपर्यंत बाजार समित्यात शेतकऱ्यांचे शोषण होतच राहील आणि त्यावर कठोर कारवाई व्हायला हवी, वरुण गांधी यांची मागणी आहे.आता भाजप या घरच्या माहेराला काय प्रत्युत्तर देतो याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here