नवी दिल्ली- भारतीय नौदलात नवीन पाणबुडी दाखल होणार आहे. आयएनएस वागीर असे या पाणबुडीचे नाव आहे. आज ही पाणबुडी भारतीय नौदलात दाखल होत आहे. ही पाणबुडी भारतीय बनावटीची असून, माझगाव डॉक येथे बांधण्यात आलेली ‘आयएनएस वागीर’ ही कलवारी वर्गाची पाचवी पाणबुडी आहे. सायलेंट किल्लर म्हणून ओळख प्राप्त असेलली प्रोजेक्ट-75 ची फ्रेंच स्कॉर्पियन डिझाइन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान अशी या पाणबुडीची ओळख आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-लक्ष्मीवाडीतील-गॅस-साठ/
पाणबुडीचे वैशिष्ट्ये
▪️भारतीय नौदलात सामील होणारी ‘आयएनएस वागीर’ पाणबुडी एक आधुनिक डिझेल-इलेक्ट्रिक अटॅक सबमरीन आहे.
▪️आयएनएस वागीर समुद्रात भूसुरुंग टाकण्यास सक्षम आहे.
▪️ही 350 मीटर खोलीवर तैनात केली जाऊ शकते.
▪️ही पाणबुडी स्टेल्थ तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.
▪️शत्रू सहजासहजी याचा शोध घेऊ शकणार नाही.
त्यामध्ये जहाजविरोधी क्षेपणास्त्रेही बसवण्यात आली आहेत.
▪️ही पूर्णपणे स्वदेशी पाणबुडी आहे.
▪️ही पाणबुडी शत्रूला शोधून अचूक लक्ष्य करु शकते.
▪️ही पाणबुडी शत्रूच्या रडारमध्ये येणार नाही.