भारतीय पुरुष हॉकी संघ टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत पराभूत झाला आहे. भारताचा गतविजेता संघ बेल्जियमने 5-2 असा पराभव केला. दोन्ही संघ मध्यंतरापर्यंत 2-2 असे बरोबरीत होते. एका टप्प्यावर या सामन्यात भारत 2-1 ने आघाडीवर होता. यानंतर बेल्जियमने आणखी चार गोल केले. बेल्जियमने चौथ्या क्वार्टरमध्ये तीन गोल केले.
बेल्जियमने 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचा 3-0 आणि 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये 3-1चा पराभव केला होता. लंडनमध्ये, दोन्ही संघ पूल टप्प्यात आमनेसामने आले होते. रिओमध्ये दोन्ही संघाचा क्वार्टर फायनलमध्ये सामना झाला होता.
आता कांस्यपदकासाठी भारताचा सामना ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी यांच्यातील उपांत्य फेरीत पराभूत संघाशी होईल. जर भारतीय संघाने तो सामना जिंकला, तर 41 वर्षांनंतर पुरुष हॉकी संघाला ऑलिम्पिक पदक मिळेल.