भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालय प्रांगणात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

0
126

भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दि. 15 ऑगस्ट 2021 रोजी ध्वजारोहणाचा राज्य शासकीय मुख्य कार्यक्रम मंत्रालय प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण करण्यात येईल.

कोविड-19 ची परिस्थिती पाहता हा कार्यक्रम मर्यादित मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार आहे.

विधान भवनात ध्वजारोहण

भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त उद्या दि. 15 ऑगस्ट रोजी मुंबई येथील विधान भवन परिसरात ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

कोविड-19 बाबतचे शासनाचे नियम पाळून सकाळी 8 वाजता विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते तसेच उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ या मान्यवरांच्या उपस्थितीत  हा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here