टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने 41 वर्षानंतर पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. भारताने हॉकीमध्ये कांस्यपदक मिळवले आहे. भारतीय हॉकी संघाला ऑलिम्पिकमध्ये शेवटचे पदक 1980 मध्ये मॉस्को येथे मिळाले होते, याचे नेतृत्व वासुदेवन भास्करन यांनी केले होते. दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाच्या लढतीत भारतीय पुरुष संघाने 5-4 असा पराभव केला आहे.
जर्मनीचे 3 गोल आणि भारतीय संघाचा 1 गोल झाला होता. भारतीय संघाने दुसऱ्या क्वार्टरमध्ये 3-1 ने पिछाडीवर असताना जोरदार पुनरागमन करत 4 गोल केले. भारताकडून सिमरनजीत सिंगने 17व्या आणि 34 व्या, हार्दिक सिंह (27 व्या), हरमनप्रीत सिंग (29 व्या) आणि रुपिंदर पाल सिंग (31 व्या) यांनी मिनटांत गोल केले. मात्र, चौथ्या क्वार्टरमध्ये जर्मनीने दुसरा गोल केला आणि स्कोअर 5-4 केला.