भुईबावडा घाटात कोसळली दरड !

0
56

राज्यात सगळीकडेच पावसाची समाधानकारक वाटचाल सुरूआहे.पण या पावसामुळे भुईबावडा घाटात दरड कोसळली आहे. सोमवारी सकाळी घाटात रस्त्याच्या मध्यभागी मोठी दरड पडल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड जेसीबीच्या साह्यने बाजूला करत मार्गावरील वाहतूक पूर्ववत केली. भुईबावडा घाट वाहतुकीस धोकादायक बनत चालला आहे. त्यातच या घाट मार्गाला नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. सोमवारी पावसामुळे दरडीचा मोठा भाग रस्त्यावर आला. याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला कळताच अधिकारी घाटात दाखल झाले. जेसीबीच्या साह्यने दरड बाजूला हटवून वाहतूक पूर्ववत केली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भुईबावडा, आंबोली, करूळ, फोंडा घाट अशा घाटामध्ये वारंवार दरडी कोसळत आहेत मात्र दरवर्षी अशा घटना घडत असूनही सार्वजनिक बांधकाम खाते कायमस्वरूपी उपाययोजना करत नसल्याने जनतेत नाराजी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here