मकर संक्रातीनिमित्त आपल्या काळ्या वेशभूषेतील फोटो‘ कार्यक्रमालां महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. महिलांनी मकर संक्रातीनिमित्त आपल्या काळ्या वेशभूषेतील फोटो‘ सदर कार्यक्रमात भाग घेऊन काळ्या साडीतील फोटो आम्हाला पाठवले. याबद्दल दैनिक सिंधुदुर्ग समाचारच्या वतीने धन्यवाद आणि अभिनंदन !
मकर संक्राती हा सण सात दिवस हळदीकुंकू आणि एकमेकांना तिळगुळ देऊन “तिळगुळ घ्या गोड बोला’ असे म्हणत साजरा केला जातो. रथसप्तमीला या सणाची सांगता होते. या दिवशी काळ्या कपड्यांना महत्व आहे. त्यामुळे या दिवशी शक्यतो काळे कपडे परिधान केले जातात. आपले सण, त्यांचे महत्व येणाऱ्या पिढीलाही कळावे आणि त्यामागची परंपरा ,मजा घेता यावी यासाठी हा प्रयत्न!