सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील 269 कुडाळ विधानसभा मतदारसंघातील एकूण 2 हजार 777 मतदाराचे विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम दरम्यान छायाचित्र नसल्याचे निदर्शनास आले आहे. अद्ययावत व शुद्ध मतदार यादी करताना व तिचे पुनःरिक्षण करताना मतदारांच्या माहितीमध्ये मतदाराचे छायाचित्र असणे अनिवार्य आहे.
त्यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी गृहभेटी करून छायाचित्र संकलित करण्याचे प्रयत्न केले. त्यानुसार छायाचित्र उपलब्ध करून देण्याची संधी उपलब्ध करून दिली. तरीही 2 हजार 777 मतदारांनी नमुना 8 मध्ये ऑनलाईन अथवा मतदान केंद्रस्तरीय अधइकारी यांच्याकडे प्रत्यक्ष स्वरुपात अर्ज केलेला नाही. तरी दि. 2 जुलै 2021 पर्यंत सदर मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे अथवा ऑनलाईन स्वरुपात नमुना 8 द्वारे आपले छायाचित्र सादर करावे.
तरी या मुदतीत छायाचित्र सादर न केल्यास छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येतील. तसेच जे मतदान विहित मुदतीत नमुना 8 द्वारे छायाचित्र सादर करण्यास असमर्थ ठरतील त्यांना त्यांच्या सर्वसाधारण रहिवासाचे ठिकाण ( लोकप्रतिनिधित्व अधिनियन, 1950 कलम 20 अन्वये) ज्या विधानसभा मदतार संघात असेल त्या मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे विहीत नमुना क्रमांक 6 द्वारे मतदार यादीत नाव नोंदविण्याचा अर्ज करण्याचा हक्क अबाधित राहील असे वंदना खरमाळे, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, कुडाळ यांनी कळविले आहे