मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी केला मुंबईतील चक्रीवादळग्रस्त भागाचा दौरा

0
102

राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री व मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज तोक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मुंबईतील विविध किनारपट्टी ठिकाणांना भेट दिली. यावेळी त्यांनी मालाड-मढ, खारदांडा, माहिम व कुलाबा येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व मच्छिमार बांधवांना दिलासा दिला.

यावेळी श्री. शेख म्हणाले की, या चक्रीवादळामुळे मच्छीमार नौका, जाळी व किनारपट्टीनजीकची घरे यांचे नुकसान झाले आहे. हवामान खात्याकडून तोक्ते वादळाची पूर्वसूचना मिळाल्यानंतर मच्छीमारांनी आपल्या नौका नांगरुन ठेवल्या होत्या. तरीही वादळाच्या तीव्रतेमुळे बोटींचे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर मदत जाहीर करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here