मनोरंजन: रत्नागिरीचा झेंडा जागतिक स्तरावर फडकला; रत्नागिरीच्या ‘विहग इव मुक्त:’ या शॉर्ट फिल्मला ‘ दुसरा’ क्रमांक

0
144
रत्नागिरी च्या 'विहग इव मुक्त:' या शॉर्ट फिल्मला ' दुसरा' क्रमांक -

नागपूर- नागपूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय संस्कृत शॉर्ट फिल्म फेस्टीवल मध्ये रत्नागिरीच्या ‘विहग इव मुक्त:’ या शॉर्ट फिल्मला ‘ दुसरा’ क्रमांक प्राप्त झाला. त्यामुळे रत्नागिरीचा झेंडा जागतिक स्तरावर फडकला. शॉर्ट फिल्मचे यंदाचे 4 वर्ष होते. या महोत्सवात 6 देशातून एकूण 110 फिल्म आल्या होत्या .त्यातून एकूण 18 सर्वोत्तम फिल्म निवडल्या गेल्या आणि त्यातूनही काटे की टक्कर म्हणून 8 शॉर्टलिस्ट करण्यात आल्या होत्या. त्यांचे प्रदर्शन संस्कृत भारती दिल्ली आयोजित अखिल भारतीय छात्र संमेलनामध्ये नागपूर येथील कविवर्य सुरेश भट नाट्यगृहात हजारोंच्या उपस्थित झाले. प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण, यांच्या हस्ते हे पारितोषिक वितरण झाले. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-दिगंबर-मोबारकर-यांचे-अल/

प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह, आणि रुपये 75,000 असे पारितोषिक स्वरूप होते. भारतातून सुद्धा काश्मीर ते तामिळनाडू पर्यंत च्या धरती वरच्या शॉर्टफिल्म्स यात सहभागी होत्या. फिल्मची संकल्पना शैलेश इंगळे या तरुण उमद्या कलाकाराची होती. त्याने या संहितेचे संपूर्ण लिखाण केले दिग्दर्शन केले आणि त्याला संस्कृत मध्ये उभं करण्याचे शिवधनुष्य पेललं. सुश्रुत चितळे आणि पूर्वा चुनेकर यांनी .तसेच सुश्रुत चितळे यांनी सुद्धा या शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन केले. श्री ललित कोर्डे यांनी या लघुपटाच्या निर्मात्याची भूमीका पार पाडली. तर ही संपुर्ण शॉर्टफिल्म उभी राहण्यासाठी मोलाचं सहकार्य रत्नागिरीतील नामवंत कलाकार नंदकिशोर जुवेकर याचे. तर अभिनयाची भक्कम बाजू समर्थपणे पेलली गो.जो. महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ निधी पटवर्धन यांनी आणि त्यांना उत्तम सह अभिमानाची जोड दिली केतकी जोशी यांनी तर सायली लिमये यांनी पटकथा साहाय्य केले.

यात प्रामुख्याने उल्लेख होतो उत्तम तांत्रिक बाजूचा , त्या साठी दिग्दर्शन साहाय्य आणि संकलन रत्नागिरीतले नामवंत कलाकार मयूर दळी यांनी केले. संगीताची सर्व जबाबदारी राधिका भिडे यांनी निभावली तसेच ध्वनी ची आदित्य गुरव यांनी. या लघुपटाचे छायाचित्र सिद्धाराज कृष्णनाथ सावंत व राज बोरकर यांनी उठावदार पणे केले होते. त्यांना साहाय्य पंकज सावंत यांनी केले. सेट साठी रोहित नागले , विशाल तलार यांनी मेहेनत घेतली.ग्राफिक्स डिझाइन ऋग्वेद जाधव यांचे होते. प्रकाश योजना अभिजीत जोशी , रंगभूषा आणि वेशभूषा स्नेहल कोकणी व रोशनी संसारे यांनी सांभाळली. तसेच व्यवस्थापन सम्यक हातखंबेकर आणि वरद चुनेकर यांनी केले. टीमचे सदस्य म्हणून चैत्राली लिमये, सिद्धांत सरफरे यांचे मोलाचे सहकार्य होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here