मराठी भाषा परीक्षांसाठी नियुक्त मंडळाची पुनर्रचना

0
51

मुंबई, दि. 6 : शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विहित केलेल्या मराठी भाषा परीक्षा घेणे व त्या परीक्षांचे निकाल यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एतदर्थ मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे.

मराठी भाषा परीक्षा – एतदर्थ मंडळाचे अध्यक्ष   प्रधान सचिव / सचिव (मराठी भाषा विभाग) असतील. सहसचिव/उपसचिव (मराठी भाषा विभाग) हे सदस्य असतील. प्राध्यापक श्री. र. रा. शेटकर (मराठी विभाग) साठे महाविद्यालय, हे अशासकीय सदस्य असतील. विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्य. मंडळ, वाशी हे सदस्य, भाषा संचालक, (महाराष्ट्र राज्य) हे सदस्य सचिव असतील.

मराठी भाषा परीक्षांसाठी विहित केलेल्या अभ्यासक्रमात आवश्यकतेनुसार बदल यासंदर्भात व परीक्षेसंदर्भातील अन्य प्रश्नांबाबत हे मंडळ शासनाला सल्ला देईल. मंडळाची पुनर्रचना होईपर्यंत अथवा त्याबाबत अन्य आदेश होईपर्यंत हे मंडळ अस्तित्वात राहील. मंडळावरील अशासकीय सदस्यांची मुदत तीन वर्षे राहील.

हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०९२९१६५१३७७२३३ असा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here